sandeep Shirguppe
बदामात मिळणारी सर्व पोषण द्रव्य शेंगदाण्यात आहेत. त्यामुळे भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास नक्कीच फायदा होतो.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी भिजवलेले शेंगदाणे खाणे नेहमीच फायद्याचे असते.
शरीराच्या कुटिल स्नायूंबद्दल काळजी करत आहात तर दररोज भिजवलेले शेंगदाणे खा बळकटी मिळेल.
शेंगदाणे भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास यातील गुणांमुळे गॅस व अॅसिडिटी दूर होते.
थोडेसे गूळ घालून भिजवलेले शेंगदाणे खा. हे खाल्यावर सांधेदुखी आणि पाठदुखीमुळे आराम मिळतो.
रात्री भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने डोळ्यांतील दृष्टी आणि स्मरणशक्ती उज्ज्वल करतात.
शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढते. याशिवाय यामुळे शारिरीक उर्जा ही चांगली राहते.
रात्री भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला कर्करोगाच्या पेशीविरूद्ध लढायला मदत करतात.