sandeep Shirguppe
आपल्या रोजच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचं अत्यंत महत्व आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
ज्वारीमध्ये फायबर, प्रथिने, खनिजे, व्हिटॅमिन्स असल्याने वजन नियंत्रण होण्यास मदत होते.
ज्वारीमध्ये असलेले फायबर आतड्यांच्या हालचालींना चालना देऊन पचनास मदत करते.
ज्वारीमध्ये असलेले फायबर पोट भरलेले ठेवते, त्यामुळे वजन नियंत्रित करणे सोपे होते.
ज्वारीमध्ये असलेले पोषक तत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
ज्वारीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदय निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
ज्वारीमध्ये असलेले प्रोटीन स्नायू आणि हाडे मजबूत करतात.