Aslam Abdul Shanedivan
हिवाळा असो वा उन्हाळा अनेक आजार उद्भवतात. अशा वेळी हेल्दी फूड्स खाणे गरजेचे असते. गाजर हेदेखील यापैकी एक सुपरफूड आहे.
गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी, के आणि बी ६, तसेच फायबर्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
गाजरच्या नियमित सेवनाने दृष्टी सुधारण्यासह हृदयाचे आरोग्य, त्वचा चमकदार आणि पचनसंस्थेसाठी चांगला उपयोग होतो.
तसेच, वजन कमी करण्यासाठी आणि अनेक आजारांचा धोका कमी करण्यासाठी देखील गाजर मदत करते.
यात व्हिटॅमिन ए (बेटा-कॅरोटीन) चं प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रातांधळेपणा आणि दृष्टीशी संबंधित इतर समस्या देखील गाजर कमी करते.
गाजरमध्ये पोटॅशियम, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतो, तर फायबर्स कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.
गाजरमधील अँटीऑक्सिडंट्स जसे की बेटा-कॅरोटीन शरीरात फ्री रेडिकल्सपासून लढतात, जे कॅन्सरचा धोका कमी करतात
गाजरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रित राहते. ब्लड शुगर लेव्हलला स्थिर ठेवण्यात मदत मिळते.