Aslam Abdul Shanedivan
गूळ आणि तूप हे भारतीय खाद्यपदार्थाचा एक महत्त्वाचा भाग असून जो प्रत्येक स्वयंपाकघरात असतो.
आयुर्वेदानुसार गूळ आणि तूप यांचे मिश्रण औषध म्हणून वापरले जात असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते
आयुर्वेदानुसार गूळ आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासह आणि हाडे मजबूत करण्यासाठी हे प्रभावी ठरू शकते.
गूळ आणि तूप एकत्र सेवन केल्यास बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि ऍसिडिटीच्या समस्यांपासून आराम मिळतो. पचनशक्ती मजबूत होते.
गूळ आणि तूप यांचे मिश्रण व्हिटॅमिन-ई, झिंक, आयन आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक सर्दी, खोकला आणि इतर मौसमी आजारांपासून बचाव करते
गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत मिळतेच शरीरही डिटॉक्स होते. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो आणि त्वचा सुधारते.
गुळासोबत तूप खाल्ल्याने मूड सुधारतो. याचे सेवन केल्याने तणाव आणि चिंता दूर होते. (Disclaimer : अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)