sandeep Shirguppe
मुखशुद्धी तसेच विविध पदार्थांतून वापरात असलेली वेलची शरीराचे स्वाथ्य वाढवण्यासाठी गुणकारी ठरते.
वेलची पचनशक्ती वाढवण्यात, पोटाची सूज कमी करण्यात आणि छातीतील जळजळ संपवण्याचे काम करते.
वेलचीची तिखट चव आणि सुगंध श्वासांची दुर्गंधी दूर करते. ही डायजेस्टिव्हला मजबूत करते.
वेलचीमध्ये उपलब्ध असलेले तेल ॲसिडिटीला नष्ट करते. तसेच लाळ ग्रंथी उत्तेजित होतात.
एक ग्लास गरम दूधामध्ये चिमुटभर वेलची पावडर टाकून पिल्ल्यास एनीमिया, अशक्तपणापासून आराम मिळतो.
वेलची मॅगनीजचे एक प्रमुख स्त्रोत आहे. मॅगनीज एंजाइमच्या स्रावमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते.
वेलची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते.
वेलची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच वेलची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते.