Amla benefit : दररोज आवळा खा निरोगी रहा!

Team Agrowon

आवळा तुरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब यावर गुणकारी ठरतो. फळात जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण अधिक असल्यामुळे आवळा मानवी शरीरास लाभदायक ठरतो.

Amla Farming | Agrowon

सर्दी, पडसे, खोकला या आजारांवर गुणकारी. रस स्मरणशक्ती वाढण्यास गुणकारी ठरतो.

Amla Farming | Agrowon

स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारात आवळ्याच्या रसाचा उपयोग केला जातो. महिलांना मासिक पाळीच्या काळात आवळ्याचे सेवन केल्याने पोटदुखी, कंबरदुखी, अनियमितता, रक्ताच्या समस्या या सर्व त्रासांवर आवळा गुणकारी ठरतो.

Amla Farming | Agrowon

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, यामुळे फायदा होतो.

Amla Farming | Agrowon

पोटामधील आजारावर आवळ्याचा रस घेतल्यास फायदेशीर ठरतो.

Amla Organic Farming | agrowon

उन्हामुळे डोळ्यांची आग होते किंवा डोळे थकतात अशा वेळी आवळ्याच्या बियांच्या काढ्याने डोळे धुतल्यास हा त्रास कमी होतो. डोळ्यांचे स्नायू बळकट होऊन दृष्टी सुधारते.

Amla Eating Benefits | agrowon