sandeep Shirguppe
कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास अनेक गंभीर आजारांमध्ये फायदे मिळू शकतात.
रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी २), नियासिन (व्हिटॅमिन बी ३), मॅग्नेशियम, पोटॅशियम, विविध फिनोलिक संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स कॉफीमध्ये असतात.
कॉफीचे सेवन केल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो, असा खुलासा संशोधकांनी केला आहे.
चरबी कमी करण्यासाठी कॉफी उपयुक्त असल्याचे अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे.
कॅफीचे सेवन करणे पचनसंस्थेसाठी फायद्याचं ठरतं. कॉफी नियमित पिल्याने पचन क्षमता ३ ते ११ टक्क्यांनी वाढते.
अमेरिकन संशोधकांनी केलेल्या अहवालानुसार कॉफी पिणाऱ्यांना हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आणि जुनाट यकृत रोग होण्याचा धोका कमी होतो.
संशोधनानुसार दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका १५ टक्क्यांपर्यंत कमी होतो.
कॉफीमध्ये असलेल्या कॅफीन तुमचा मूड, संज्ञानात्मक कार्य आणि ऍथलेटिक कार्यप्रदर्शन वाढवू शकते.