Anuradha Vipat
केसांसाठी अंडी वापरण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत. तुम्ही संपूर्ण अंडे, अंड्यातील पिवळ बलक किंवा अंड्याचा पांढरा भाग वापरू शकता.
अंड्यामध्ये प्रथिने आणि पोषक तत्वे असल्याने केस मजबूत होतात आणि चमकदार दिसतात.
अंड्यातील पोषक तत्वे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात, ज्यामुळे केसगळती कमी होते.
अंड्यातील फॅट्स केसांना मॉइश्चरायझ करतात, ज्यामुळे केस मुलायम आणि रेशमी होतात.
अंड्याचा वास सहन होत नसेल, तर मास्कमध्ये लिंबाचा रस किंवा इसेंशियल ऑइल मिसळा
अंड्याची ऍलर्जी असल्यास, केसांवर वापरण्यापूर्वी हातावर थोडेसे मिश्रण लावून ऍलर्जी तपासणे आवश्यक आहे
केस ओले असताना अंडी लावल्यास, ते केसांना चांगले लागते.