Mahesh Gaikwad
गट हेल्थ म्हणजेच आपल्या आतड्यांचे आरोग्य. गट हेल्थ पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक प्रणालीसाठी अत्यंत महत्त्वाची असते.
गट हेल्थ चांगली असणे केवळ पचनासाठीच नाही, तर संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. निरोगी गट हेल्थमुळे शरीराची कार्यप्रणाली प्रभावीपणे कार्य करते.
संतुलित गट हेल्थमुळे पचन सुधारते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते
चांगल्या गटसाठी आहारात फायबरयुक्त भाज्या आणि फळांचा समावेश असावा. तसेच दही, ताक, लोणचे, ओट्स, केळी अशा पदार्थांचाही समावेश असावा.
निरोगी गट हेल्थसाठी जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूड, अनियमित जेवण, पुरेशी झोप न घेणे, सततचा मानसिक ताण या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
नियमित व्यायाम केल्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनक्रिया सुलभ होते. चालणे, योगासने आणि सौम्य स्ट्रेचिंग गट हेल्थसाठी फायदेशीर असते.
पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांतील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
आपल्या पचनसंस्थेचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य हे एकमेकांशी जोडलेले आहे. मेडिटेशन आणि पुरेशी झोप घेतल्यामुळे गट हेल्थ सुधारते. तणाव कमी केल्यास पचनाशी संबंधित त्रास कमी होतात.
गट हेल्थ सुधारण्यासाठी घरगुती आंबवलेले पदार्थ कमी प्रमाणात परंतु वारंवार खावेत. संतुलित आहार घ्या. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.