Swarali Pawar
पानांचा खालचा भाग लालसर-तपकिरी व वरचा भाग पिवळसर पडतो. पाने सुरकुततात, वाळतात आणि फुले गळतात.
उन्हाळ्यात खोल नांगरणी करा. बियाण्यांवर इमिडाक्लोप्रिड प्रक्रिया करा. फेरपालट पद्धती अवलंबा आणि नीमपेंड, गांडूळ खत वापरा.
मिरचीबरोबर मका, ज्वारी आणि चवळी मिश्र पीक घ्या. उंच पिकांचा अडथळा तयार होतो आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी होतो.
जास्त बाधित झाडे उपटून जाळा. तण नियंत्रण करा. शेतात निळे/पांढरे चिकट सापळे लावा आणि स्प्रिंकलरने पाणी द्या.
निंबोळी अर्क, करंज तेल किंवा निरगुडी अर्काची फवारणी करा. बिव्हेरिया बॅसियाना सारखी जैविक कीटकनाशके वापरा.
सूत्रकृमी (स्टायनर्नीमा, हेटेरोरॅब्डिटिस) आळवणी करा. समुद्री गवताचा अर्क (कॅपाफायकस अल्वारेझी) फवारणीसाठी उपयुक्त ठरतो.
शिफारशीप्रमाणे इथिऑन, स्पिनोसॅड, फिप्रोनिल किंवा संयुक्त कीटकनाशकांची फवारणी करा. नेहमी योग्य मात्रेत व योग्य पद्धतीने वापरा.
एकाच गटातील कीटकनाशक सतत वापरू नका. शिफारशीचेच औषध वापरा. वेळेवर उपाययोजना केल्यास ब्लॅक थ्रिप्सवर नियंत्रण मिळवता येते.