Swarali Pawar
पाऊस आणि गारपीटीनंतर फळगळ होणं सामान्य आहे. पण योग्य वेळी उपाय केल्यास उत्पादन वाचवता येतं.
गारपीट झालेली फळे लगेच तोडून टाका. यामुळे रोग पसरत नाही आणि बाग सुरक्षित राहते.
तुटलेल्या फांद्या कापून त्या जागी बोर्डो मलम लावा. यामुळे झाड लवकर बरे होते आणि वाढ सुधारते.
कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करा. यामुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
रोगग्रस्त पाने-फांद्या कापून जाळून टाका. कॉपर ऑक्सिक्लोराईड + स्ट्रेप्टोमायसीन फवारणी करा.
प्रति झाड ७५० ग्रॅम युरिया द्या. यामुळे फुलगळ आणि फळगळ कमी होते.
फळे वाटाणा आकाराची असताना NAA ची १.५ ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. यामुळे फळधारणा टिकून राहते.
छाटणी, फवारणी, स्वच्छता आणि खत- पाणी व्यवस्थापन करा. यामुळे संत्रा-मोसंबी बाग सुरक्षित राहील.