Mahesh Gaikwad
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कामातील स्पर्धा आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यामुळे अनेकांचा स्ट्रेस म्हणजेच मानसिक तणाव वाढतो आहे.
दैनंदिन आयुष्यातील तणाव कमी करण्यासाठी आणि मन:शांतीसाठी काही छोटे-छोटे उपाय आहेत ते नक्की करून बघा.
दररोज ५ मिनिटे दिर्घ श्वास घेणे व सोडणे याचा सराव करा. यामुळे तणाव कमी होवून ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि मन शांत होते.
रोज सकाळी मोकळ्या हवेत चालणे, व्यायाम करणे यामुळे शरीरात एंडॉर्फिन नावाचे “हॅपी हार्मोन्स” स्रवतात परिणामी तणाव कमी होण्यास मदत होते.
तणाव कमी करण्यासाठी दररोज ७-८ तास झोप घेणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड आणि चिंता वाढते.
तणाव कमी करण्यासाठी हसणे हा सर्वात चांगला आणि प्रभावी उपाय आहे.
शांत आणि आवडते संगीत ऐकणे हा तणाव कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात.
दररोज १० मिनिटे ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि चिंता कमी होते. हे मानसिक स्थैर्यासाठी उपयुक्त आहे.