Anuradha Vipat
घरामध्ये सुख, शांतता टिकवून ठेवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात मिठाचे उपाय अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत.
मीठ हे राहू आणि केतू ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी तसेच घरातील वाईट शक्तींना बाहेर काढण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते.
आठवड्यातून किमान दोनदा घर पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
एका काचेच्या छोट्या वाटीत खडे मीठ भरून ते बाथरूम किंवा शौचालयाच्या अशा कोपऱ्यात ठेवावे जेथे कोणाचे सहज लक्ष जाणार नाही. बाथरूम हा नकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्त्रोत मानला जातो.
एका लाल रंगाच्या कपड्यात थोडे खडे मीठ बांधून त्याची पुरचुंडी घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बाहेरून टांगावी.
जर घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, तर त्याच्या बेडखाली किंवा डोक्याच्या बाजूला काचेच्या वाटीत थोडे मीठ ठेवावे.
काचेच्या एका वाटीत मीठ भरून त्यामध्ये ४ ते ५ लवंग टाकून ती वाटी घराच्या किंवा तिजोरीच्या जवळ ठेवावी.