Anuradha Vipat
वाढदिवस असो किंवा एखादं सेलिब्रेशन केक हा हवाचं. चला तर मग आज आपण पाहूयात चॉकलेट केक बनवण्याची सोपी रेसिपी.
मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, मीठ, बटर, पिठीसाखर, दही, अंडी, व्हॅनिला इसेन्स.
सर्वप्रथम ओव्हन १८०°C पर्यंत गरम करा. भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करुन घ्या.
बटर आणि पिठीसाखर मिश्रण क्रीमी होईपर्यंत फेटून घ्या. त्या मिश्रणात अंडी, दही आणि व्हॅनिला इसेन्स घालून ते चांगल मिक्स करा .
साहित्य ओल्या मिश्रणात मिसळा. तयार केलेले मिश्रण बेकिंग पॅनमध्ये ओता आणि प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये बेक करा.
केक बेक झाल्यावर पॅनमधून काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.
यानंतर केकवर चॉकलेट फ्रॉस्टिंग किंवा बटरक्रीम लावून केक चांगला सेट करा