Winter Cracked Heels : महागड्या फुट क्रीम्सना करा बाय-बाय; टाचांना पडलेल्या भेगा भरून काढतील 'हे' देशी उपाय!

Anuradha Vipat

भेगा पडण्याची समस्या

हिवाळा सुरू होताच थंड आणि कोरड्या हवेमुळे पायांच्या टाचा कोरड्या पडून भेगा पडण्याची समस्या अनेकांना सतावते.

Winter Cracked Heels | Agrowon

पायांच्या भेगा

घरातच उपलब्ध असलेल्या साध्या गोष्टींचा वापर करून तुम्ही काही दिवसांतच पायांच्या भेगा भरून काढू शकता आणि पाय मऊ ठेवू शकता.

Winter Cracked Heels | Agrowon

कोमट पाणी आणि मध

एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात अर्धा कप मध किंवा थोडे मीठ व शाम्पू टाका. यात १५-२० मिनिटे पाय भिजवून ठेवा आणि नंतर प्युमिस स्टोनने हलक्या हाताने टाचांची मृत त्वचा घासून काढा.

Winter Cracked Heels | agrowon

मेणबत्तीचे मेण आणि मोहरीचे तेल

थोड्याशा मोहरीच्या किंवा खोबरेल तेलात मेणबत्तीचे तुकडे टाकून गरम करा. मेण पूर्ण विरघळल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण कोमट झाल्यावर टाचांच्या भेगांमध्ये भरून रात्रभर मोजे घाला.

Winter Cracked Heels | agrowon

ग्लिसरीन आणि गुलाबपाणी

ग्लिसरीन आणि गुलाबपाणी एकत्र करून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. रात्री पाय स्वच्छ धुतल्यानंतर हे मिश्रण टाचांना लावल्याने त्वचा मऊ होते.

Winter Cracked Heels | agrowon

साजूक तूप किंवा खोबरेल तेल

रात्री झोपताना टाचांना कोमट साजूक तूप किंवा खोबरेल तेलाने ५ मिनिटे मसाज करा आणि सुती मोजे घालून झोपा.

Winter Cracked Heels | Agrowon

पिकलेले केळे

पिकलेले केळे चांगले कुस्करून त्याची पेस्ट टाचांवर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. केळ्यातील पोषक घटकांमुळे कोरड्या पडलेल्या टाचांना नैसर्गिक ओलावा मिळतो.

Winter Cracked Heels | Agrowon

Winter Home Care : रूम हीटरची गरजच भासणार नाही! हिवाळ्यात घर नैसर्गिकरीत्या उबदार ठेवण्याच्या 'या' स्मार्ट ट्रिक्स नक्की ट्राय करा

Winter Home Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...