Fasting Recipes : नेहमीची खिचडी सोडून उपवासाला बनवा 'हे' ७ झटपट आणि टेस्टी पदार्थ!

Anuradha Vipat

पदार्थ

उपासाला नेहमीची साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, तर हे चवदार आणि झटपट होणारे पदार्थ नक्की ट्राय करा

Fasting Recipes | agrowon

उपवासाचे थालीपीठ

भगरीचे पीठ, शिंगाडा पीठ, उकडलेला बटाटा, शेंगदाणा कूट, मिरची पेस्ट आणि उपवासाचे मीठ. सर्व साहित्य एकत्र मळून घ्या. तव्यावर तूप लावून थालीपीठ थापा आणि दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून घ्या.

Fasting Recipes | Agrowon

साबुदाणा वडा

भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि जिरे. एकत्र गोळा मळून वडे बनवा. हे वडे कढईत तळून घ्या.

Fasting Recipes | agrowon

रताळ्याचा कीस

किसलेली रताळी, तूप, जिरे, हिरवी मिरची, साखर आणि शेंगदाणा कूट. तुपात जिरे-मिरचीची फोडणी द्या. त्यात रताळ्याचा कीस, कूट आणि साखर घालून वाफेवर ५ मिनिटे शिजवून घ्या.

Fasting Recipes | Agrowon

उपवासाचा बटाटा शिरा

उकडलेले बटाटे, शुद्ध तूप, साखर, दूध आणि सुकामेवा. तुपावर मॅश केलेला बटाटा चांगला परतून घ्या. त्यात दूध आणि साखर घालून आटवा.

Fasting Recipes | agrowon

वरीच्या तांदळाचा पुलाव

तुपात जिरे, मिरची, बटाटा परता. धुलेली भगर घालून दुप्पट गरम पाणी टाका आणि भातासारखा शिजवून घ्या.

Fasting Recipes | agrowon

उपवासाचे अप्पे

वरीचे तांदूळ आणि साबुदाणा पीठ, दही आणि मिरची. हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्या. अप्पे पात्रात तूप सोडून हे मिश्रण टाका आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर शेका.

Fasting Recipes | Agrowon

Listening To Music : चालताना गाणी ऐकण्याचे फायदे आणि तोटे: काय सांगते विज्ञान?

Listening To Music | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...