Anuradha Vipat
दृष्टी कमी होण्यापूर्वी किंवा डोळ्यांचे गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही महत्त्वाचे संकेत देते.
अचानक किंवा हळूहळू अस्पष्ट दिसू लागणे हे मोतीबिंदू किंवा दृष्टीदोषाचे लक्षण असू शकते.
डोळ्यांसमोर अचानक प्रकाशाचे झोत दिसणे किंवा काळे ठिपके फिरताना दिसणे हे रेटिना सरकल्याचे संकेत असू शकतात.
अंधारात त्रास होणे हे व्हिटॅमिन-ए च्या कमतरतेचे किंवा मोतीबिंदूचे लक्षण असू शकते.
सतत डोळे लाल राहणे, खुपणे किंवा तीव्र वेदना होणे हे इन्फेक्शन किंवा ग्लुकोमाचे लक्षण असू शकते.
एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे हे मज्जासंस्थेच्या किंवा डोळ्यांच्या स्नायूंच्या समस्येचे लक्षण असू शकते.
अचानक प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होणे किंवा डोळे उघडता न येणे.