Mahesh Gaikwad
यकृत हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव असून याच्या आजाराची अनेक लक्षणे असून शकतात. त्यामुळे वेळीच ही लक्षणे ओळखणे गरजेचे असते.
यकृतामध्ये समस्या असल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे सतत थकवा व अशक्तपणा जाणवत राहतो.
यकृताचे कार्य बिघडल्यामुळे पचनक्रिया प्रभावित होते आणि भूक कमी लागते. परिणामी वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
यकृतातील बिघाडामुळे रक्तात बिलिरुबिन वाढते, ज्यामुळे त्वचा, डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर होतो.
यकृताच्या आजारात पोटामध्ये पाणी साठते. तसेच पोटाच्या उजव्या बाजूच्या वरच्या भागात वेदना जाणवतात.
लवघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होणे हेही यकृताच्या आजाराचे लक्षण आहे.
त्वचेवर खाज येणे हे यकृताच्या आजाराचे लक्षण आहे. यकृतातील बिघाडामुळे रक्तातील द्रव्ये त्वचेवर परिणाम करतात.
दरम्यान, वरील कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टांरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून गंभीर आजार टाळता येवू शकतो.