Anuradha Vipat
सध्याच्या या बदलत्या काळात मुलींना मासिक पाळी खूपचं लवकर येत आहे. पुर्वी मुलींना १४ ते १५ वर्षांनंतर मासिक पाळी येत होती.
सध्या ७ ते १० वर्षांच्या मुलींना मासिक पाळीला सामोरे जावं लागतं आहे. या मागे काय कारणे असू शकतात ते पाहूयात.
सध्या मुलींच्या शरीरातील संप्रेरकांची पातळी बदलत आहे त्यामुळे तारुण्य लवकर सुरू होऊन मासिक पाळी लवकर येत आहे
मेंदूतील ट्यूमरमुळे संप्रेरकांचे कार्य बिघडते त्यामुळे लवकर मासिक पाळी येत आहे .
आत्ताच्या मुलींना आभ्यासाचा जास्त ताण आहे. जास्त ताणतणावामुळे हार्मोन्सवर परिणाम होतो आहे आणि मासिक पाळी येते आहे.
शरीराचे वजन अचानक कमी होणे किंवा वाढणे यामुळेही मासिक पाळी लवकर येते आहे.
लहान मुलींमध्ये काही औषधांच्या वापरामुळे देखील मासिक पाळीच्या चक्रात बदल होत आहे.