Anuradha Vipat
आजच्या काळात बदललेली जीवनशैली आणि आहारामुळे अनेक मुलींना वयाच्या ८ व्या किंवा ९व्या वर्षीच मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे.
मुलींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी पालकांनी त्यांच्या खालील सवयींकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
बाहेरचे तळलेले पदार्थ आणि प्लास्टिक पॅकिंगमधील पदार्थांमुळे शरीरात 'इस्ट्रोजेन' सारख्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
मुलींना घरचा ताजा आहार, हिरव्या पालेभाज्या आणि फळे खाण्याची सवय लावा.
मुलींना दररोज किमान १ तास मैदानी खेळ खेळण्याची किंवा सायकलिंग, पोहणे यांसारख्या व्यायामाची सवय लावा.
रात्री ९ ते १० च्या दरम्यान झोपण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी किमान १ तास सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद ठेवा.
पाणी पिण्यासाठी स्टील, काच किंवा तांब्याच्या बाटल्यांचा वापर करा. गरम अन्न प्लास्टिकच्या डब्यात ठेवणे टाळा.