Anuradha Vipat
वेळोवेळी कान साफ करणे गरजेचे आहे. काहीवेळा जास्त मळ साठल्याने कान ब्लॉक होतात.
चला तर मग आजच्या या लेखात आपण एका झटक्यात कान साफ कसे करायचे याचे काही घरगुती उपाय पाहूयात.
कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
झटक्यात कान साफ करण्याठी कोमट पाण्यात मिठ , बेकिंग सोडा किंवा हायड्रोजन पेरॉक्साइडचे थेंब ड्रॉपरने कानात टाका.
कान एका मिनिटासाठी बाजूला झुकवा, ज्यामुळे द्रव बाहेर येईल आणि कान स्वच्छ होण्यास मदत होईल.
कान दुखत असल्यास किंवा संसर्ग झाल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कानातील मळ काढण्यासाठी तुम्ही थोडेसे गरम केलेले ऑलिव्ह ऑईल देखील त्यात टाकू शकता.