e Peek Pahani App : ई- पीक पाहणी करणे झाले आता सोपे, ही आहे सोपी पद्धत

sandeep Shirguppe

पीक पाहणी अॅप

शेतकऱ्यांना पेरलेल्या पिकाची अचूक नोंद सरकार दप्तरी व्हावी यासाठी पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. प्रशासनाकडून काही बदल करण्यात आले आहेत.

e Peek Pahani App | agrowon

कशी करावी पीक पाहणी

प्ले स्टोअरमधून ई - पीक पाहणी अॅप डाऊनलोड करा. डावीकडे दोन वेळा स्क्रोल केल्यानंतर निवडा या पर्यायाच्या ठिकाणी पुणे विभाग निवडा.

e Peek Pahani App | agrowon

गट क्रमांक टाका

शेतकरी म्हणून लॉगइन केल्यानंतर वरीलप्रमाणे पर्याय दिसतील. गट क्रमांक टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव समोर येईल.

e Peek Pahani App | agrowon

चार अंकी पासवर्ड

खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल क्रमांक टाका. एसएमएसद्वारे चार अंकी पासवर्ड येईल, तो लक्षात ठेवा.

e Peek Pahani App | agrowon

फोटो काढा

त्यानंतर होम पेजवर येऊन पिकाची माहितीसाठी हा फॉर्म भरता येईल. त्यानंतर कॅमेरा पर्याय येईल, त्याद्वारे फोटो काढून फॉर्म सबमिट करा.

e Peek Pahani App | agrowon

झाडांची माहिती

बांधावरील झाडांची माहिती नोंदविण्यासाठी असे पर्याय उपलब्ध आहेत. माहिती भरून सबमिट केल्यानंतर अ पवरच असा संदेश येईल.

e Peek Pahani App | agrowon

ई - पीक पाहणीचे फायदे

शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद, दुष्काळ, अतिवृष्टीनंतर नुकसानीपोटी विमा, भरपाईची योग्य नुकसानग्रस्ताला लाभ मिळेल.

e Peek Pahani App | agrowon

अचूक आकडेवारी

राज्यासह देशात कोणत्या पिकाचा किती पेरा झाला याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध.

e Peek Pahani App | agrowon