Anuradha Vipat
घरातील धुळीतील सूक्ष्म कीकांमुळे होणारी ॲलर्जी टाळण्यासाठी स्वच्छतेच्या काही पद्धती अवलंबणे गरजेचे आहे.
आठवड्यातून किमान एकदा बेडशीट आणि उशीचे अभ्रे ६०° अंश सेल्सिअस गरम पाण्यात धुवावेत. यामुळे कीटक आणि त्यांची अंडी नष्ट होतात.
ज्या वस्तू धुणे शक्य नाही त्या अधूनमधून कडक उन्हात ३-४ तास ठेवाव्यात. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे कीटकांचा नायनाट होतो.
कोरड्या फडक्याने किंवा झाडूने धूळ झटकू नका त्याऐवजी नेहमी ओल्या सुती कापडाने फर्निचर आणि जमीन पुसून घ्यावी
घरातील खिडक्या उघड्या ठेवून पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा खेळती ठेवा.
बेडरूममध्ये कार्पेट्स, जड पडदे किंवा मऊ खेळणी धूळ साठवण्याचे काम करतात.
कपडे धुताना किंवा फरशी पुसताना पाण्यात निलगिरी तेलाचे काही थेंब टाकल्यास डस्ट माईट्स मरण्यास मदत होते आणि घरही निर्जंतुक होते