Anuradha Vipat
हिंदू संस्कृती आणि पंचांगानुसार वर्षातील साडेतीन मुहूर्त हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात.
या साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण आणि अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे 'दसरा' .
या दिवशी कोणत्याही प्रकारचे पंचांग न पाहता किंवा शुभ वेळ न काढता केलेले कोणतेही नवीन कार्य, खरेदी किंवा गुंतवणूक अत्यंत यशस्वी आणि फलदायी ठरते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
हिंदू धर्मशास्त्रात वर्षातील काही दिवस हे स्वयंघोषित किंवा स्वयंसिद्ध मुहूर्त मानले जातात. म्हणजेच या दिवशी संपूर्ण दिवसभरातील प्रत्येक क्षण हा शुभ असतो.
दसऱ्याच्या दिवसाला 'विजयादशमी' असे म्हटले जाते, कारण हा सण पराक्रम आणि विजयाचे प्रतीक आहे.
याच दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून असत्यावर सत्याचा विजय मिळवला होता.
महाभारतात अज्ञातवास संपवून पांडवांनी शमीच्या झाडावरून आपली शस्त्रे काढून शत्रूवर विजय मिळवण्याची सुरुवात याच दिवशी केली होती.