Anuradha Vipat
आज रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्रीची आठवी माळ आहे.
आजच्या दिवशी देवीचे अत्यंत शांत आणि शक्तीशाली रूप असलेल्या माता महागौरीची पूजा केली जाते.
आज देवी महागौरीला नारळ किंवा नारळापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात.
असे मानले जाते की, देवीला नारळाचा भोग चढवल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि सुख-समृद्धी लाभते.
ओल्या किंवा सुक्या नारळाचे लाडू अथवा बर्फी बनवून देवीला नैवेद्य दाखवावा.
दुधात ओल्या नारळाचा किस आणि सुकामेवा घालून बनवलेली खीर आजच्या दिवशी उत्तम मानली जाते.
जर काही बनवणे शक्य नसेल, तर अख्खा नारळ किंवा नारळाचे तुकडे आणि गूळ एकत्र ठेवून भोग चढवू शकता.