Flower Market : उन्हाळ्यात फुलांचा सुगंध महाग

Team Agrowon

पिकांना भर उन्हाळ्यात पाणी नसले तरी या दिवसांत लग्नसराईमुळे फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे हार, बुके खरेदीवर अनेकांचा भर असतो.

Flower Market | Agrowon

यंदा पाण्याअभावी गुलाब दोनशे रुपये किलो; तर निशिगंध तब्बल अडीचशे ते तीनशे रुपये किलो झाला आहे. परिणामी, उन्हाळ्यात फुलांचा सुगंध महाग झाल्याचे चित्र आहे.Flower Market

Flower Market | Agrowon

यंदा दुष्काळ असल्याने फुलांची आवकही कमी असल्याचे चित्र आहे. परिणामी, फुलांच्या दरात वाढ झाली आहे.

Flower Market | Agrowon

महिनाभरापूर्वी गुलाब शंभर ते दीडशे रुपये किलो होता. आता तो दोनशे रुपये किलो झाला आहे; तर सव्वादोनशे ते अडीचशे रुपये किलो भाव असलेला निशिगंध आज अडीचशे ते तीनशे रुपये किलो आहे.

Flower Market | Agrowon

फुलांचे दर वाढल्याने बुके आणि हारांचे दरही वाढले आहे. त्यात लग्नसराई असल्याने फुलांच्या हारांची मोठी मागणी आहे.

Flower Market | Agrowon

बाजारात फुलांची आवक कमी झाल्याने हार, बुके खरेदी करताना खिशाला मोठी कात्री लागत असल्याचे चित्र आहे.

Flower Market | Agrowon

उन्हाळ्याचे दिवस असल्याने निशिगंध, जरबेरा, डच गुलाब ही फुले लवकर सुकतात. त्यामुळे ग्राहकांना ताज्या फुलांचे हार देण्यासाठी दररोज फुलांची गरज पडते.

Flower Market | Agrowon

Animal Care : अशी ओळखा जनावरांतील धनुर्वाताची लक्षणे