Anuradha Vipat
रात्रीच्या वेळी कपडे बाहेर वाळत टाकू नये यामागे धार्मिक समजुती आणि वैज्ञानिक कारणे आहेत.
रात्रीच्या वेळी हवेत आर्द्रता किंवा दव जास्त असते. यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत आणि ते ओलसर राहिल्यामुळे त्यांना कुबट वास येऊ लागतो.
सूर्यास्तानंतर वातावरणात नकारात्मक ऊर्जा किंवा 'तामसिक' शक्तींचा प्रभाव वाढतो.
असे मानले जाते की बाहेर वाळत असलेल्या कपड्यांद्वारे ही नकारात्मकता घरात येऊ शकते.
रात्रीच्या हवेत विशिष्ट प्रकारचे जंतू असतात जे कपड्यांना चिकटतात आणि तेच कपडे पुन्हा घातल्यास शरीराला आजार होऊ शकतात.
काही कापडांना रात्रीच्या थंडीमुळे किंवा ओलाव्यामुळे त्यांचे तेज गमवावे लागते.
रात्रीच्या वेळी कापडे बाहेर न ठेवता घराच्या आत किंवा बाल्कनीत वाळवणे आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक चांगले आहे.