Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडणे ही एक सामान्य समस्या आहे.
कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि तिला मऊ व तजेलदार ठेवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता
थंडीमुळे त्वचा कोरडी पडली तर सर्वात पहिले हायड्रेशन महत्त्वाचं आहे
आंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरणे टाळा. गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते
त्वचा ओलसर असतानाच मॉइश्चरायझर, लोशन किंवा क्रीम लावा. यामुळे ओलावा त्वचेत लॉक होतो.
आंघोळीनंतर संपूर्ण शरीराला खोबरेल तेल लावा. खोबरेल तेल उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
शरीराला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.