Anuradha Vipat
थंडीच्या दिवसात त्वचा खरोखरच 'काळी' पडत नाही तर ती काळवंडलेली किंवा निस्तेज दिसते.
आज आपण पाहूयात थंडीच्या दिवसात हवामान बदलामुळे त्वचेमध्ये होणारे बदल यामागे कोणती मुख्य कारणे आहेत.
हिवाळ्यात हवा खूप कोरडी असते आणि हवेतील आर्द्रता कमी होते. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो
हिवाळ्यात कोरड्या त्वचेचा रंग नैसर्गिकरित्या गडद दिसतो.
कोरडेपणामुळे त्वचेच्या मृत पेशी वेगाने गळतात यामुळे त्वचा निस्तेज आणि काळवंडलेली दिसते.
थंडीमुळे शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या किंचित आकुंचन पावतात
थंडीच्या दिवसात तहान कमी लागते त्यामुळे लोक पाणी कमी पितात. यामुळे त्वचा निस्तेज आणि गडद दिसते.