Anuradha Vipat
कोरड्या त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर निवडणे आणि ते योग्य पद्धतीने लावणे त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यात किंवा बदलत्या हवामानात कोरडेपणा जास्त वाढतो. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.
कोरड्या त्वचेला साध्या लोशनपेक्षा जास्त पोषण देणाऱ्या क्रीम किंवा मलमची गरज असते.
आंघोळ केल्यावर किंवा चेहरा धुऊन झाल्यावर त्वचा पूर्ण कोरडी करू नका. त्वचा किंचित दमट असतानाच लगेच मॉइश्चरायझर लावा.
सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला आणि शरीराला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
मॉइश्चरायझर लावताना त्वचा रगडू नका, तर वरच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करा.
जास्त सुगंध आणि अल्कोहोल असलेली उत्पादने वापरू नका, यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि लाल होऊ शकते.