Anuradha Vipat
तोंड वारंवार कोरडे पडणे ही समस्या केवळ तहान लागल्यामुळेच नाही, तर इतर अनेक आरोग्यविषयक कारणांमुळे असू शकते.
शरीरात पुरेसे पाणी नसल्यामुळे लाळ ग्रंथी लाळ तयार करू शकत नाहीत.
रक्तदाब, ॲलर्जी, नैराश्य किंवा पेनकिलर्स यांसारख्या औषधांमुळे तोंड कोरडे पडू शकते.
वाढत्या वयानुसार लाळ तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास तोंड कोरडे पडण्याचे लक्षण प्रामुख्याने दिसते.
कॅफिनच्या अतिसेवनामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि लाळ सुकते.
सततच्या चिंता किंवा भीतीमुळे शरीरातील लाळ निर्मितीवर परिणाम होतो.