Drought Conditions : दुष्काळाचे चटके पशूधनाला! लाख मोलाची बैलजोडीची किंमत फक्त ५० हजार

Aslam Abdul Shanedivan

पावसाचा लहरीपणा

गेल्या वर्षी राज्यात पावसाने दडी मारल्याने ४० तालूक्यासह नवीन महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. २२४ नवीन महसूल मंडळात दुष्काळ घोषित झाला आहे.

Drought Conditions | Agrowon

बीड जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती

यात बीड जिल्हा देखील येत असून येथे सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Drought Conditions | Agrowon

चारापाण्याचा प्रश्न

यामुळे शेतकरी आर्थिक संकंटात सापडला आहे. अशातच गाय, बैल, म्हैशीच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे

Drought Conditions | Agrowon

पशूधन विकावे लागत आहे

या चिंतेतून शेतकरी आपल्याकडी पशूधन हे बाजारात नेऊन नाइलाजाने विकत आहे

Drought Conditions | Agrowon

लाख रूपये किंमतीची बैल जोडी

नेकनूरच्या आठवडी बाजारात लाखांची किंमत असणाऱ्या राजा- सर्जाची किंमत फक्त ५० ते ६० हजारांची झाली

Drought Conditions | Agrowon

व्यापारी पाडून मागतात

दरम्यान गेल्यावर्षी जी बैल जोडी ८० हजारात विकत घेतली. ती २० ते २५ हजारांत मागीतली जात असल्याचे शेतकरी विभीषण धवन यांनी सांगितले आहे.

Drought Conditions | Agrowon

किंमती घसरल्या

तर बाजारात ग्राहक नसल्याने या किंमती घसरल्या असून ५ ते १० हजार त्यांचे नुकसान होत असल्याचे व्यापारी प्रवीण ससाने यांनी सांगितले आहे.

Drought Conditions | Agrowon

Animal Care : दुधाळ गायी, म्हशीला कसा आहार द्याल?