Team Agrowon
वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्याची गरज पाहता कमी कालावधीत जलद पैदास वाण निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे.
मात्र आता सुधारित पद्धतींच्या संचासाठी जलद पैदास प्रक्रियेचा वापर केला जातो. हा प्रयोग अमेरिकेतील नासा या संस्थेने उटाह राज्य विद्यापिठासोबत अंतराळात केला. ज्यात गव्हाची रोपे वाढवण्याचा प्रयोग झला.
या रोपांना कृत्रिम प्रकाश दिल्याने त्यांचे लवकर पुनरुत्पादन झाले. तर ‘यूएसयू अपोजी’ हा वाण विकसित करण्यात आला, जो की कमी उंचीचा वाण आहे.
२००३ मध्ये गव्हाच्या प्रजननाला गती देण्यासाठी प्राध्यापक डॉ.ली हिकी ही कल्पना साकारली आणि जलद पैदास प्रक्रिया (स्पीड ब्रीडिंग) हा शब्दप्रयोग केला.
जलद पैदास प्रक्रिया तंत्राचा मोठ्या प्रमाणावर संशोधनासाठी वापर केला जात असून २०१८ मध्ये 'डीएस फॅराडे' हा गव्हाचा नवीन वाण विकसित केला, हा वाण उच्च प्रथिने असणारा आहे.
जलद पैदास प्रक्रिया तंत्राचा मोठ्या प्रमाणावर संशोधनासाठी वापर केला जात असून २०१८ मध्ये 'डीएस फॅराडे' हा गव्हाचा नवीन वाण विकसित केला, हा वाण उच्च प्रथिने असणारा आहे.
असे आहे तंत्रज्ञान
यात काचगृह किंवा ग्रीनहाऊसमध्ये विशेष प्रजनन तंत्रज्ञानाने रोपांची उगवण केली जाते. ज्यामध्ये विशिष्ट प्रकाश अवधी, प्रकाशाची तीव्रता, आर्द्रता आणि तापमान असते.
वेगवान वाढ आणि विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी वेगवान प्रजननामध्ये अनेक तांत्रिक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. ज्यात विस्तारित प्रकाश कालावधी, एल इ डी प्रकाश, तापमान नियंत्रण, सापेक्ष आर्द्रता वापरली जाते.