Mahesh Gaikwad
भारतीय परंपरेत बहुतांश घरांमध्ये अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सवय असते. विशेषत: लहान मुलांनी रात्री दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
पण नुसते दूध पिण्यापेक्षा यामध्ये हळद घालून प्यायल्यास ते एक उत्तम सुपरड्रिंक म्हणून आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
हळद आणि दूध एकत्र करून प्यायल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेवूया हळद दूध पिण्याचे फायदे.
हळदीमध्ये अँटी-इन्फ्लामेटरी आणि अँटी-बॅक्टोरीयस गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते.
हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक टाकण्यास मदत करतात. यामुळे त्वचा उजळून चेहऱ्यावर चमक येते.
दूधामध्ये कॅल्शियम असते, जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते. हळद दूध प्यायल्याने सांध्याच्या वेदना कमी होऊन आखडलेपणा कमी होतो.
हळदीच्या दुधातील औषधी घटकांमुळे शरीराची रोगगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी हळद दूध प्यायल्यामुळे शरीर आणि मन शांत होते. परिणामी ताण-तणाव कमी होवून गाढ झोप लागते.