sandeep Shirguppe
चहा पिण्याचा छंद अनेकांना असतो याची वेळ पाहिली जात नाही, कडक उकळलेला चहा अनेकांना आवडत असतो.
तुम्हाला माहितीय का? हा असा अति उकळेला चहा पिणं म्हणजे घातक आजाराला निमंत्रण असल्याचे धोतक आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार चहा योग्य प्रकारे तयार केला असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत.
पण चहा अतिप्रमाणात उकळलेला असेल तर ते आरोग्यासाठी घातक आहे.
चहा पावडर, साखर घालून खूप उकळणं आणि नंतर दूध घालून चहा खूप उकळणं ही चुकीची पध्दत असल्याचं अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
जास्त वेळ दुधाचा चहा उकळल्यामुळे कर्करोगजन्य पदार्थ ऍक्रिलामाइड तयार होऊन कर्करोगाचा धोका वाढतो.
दुधाचा चहा जास्त वेळ उकल्यानंतर त्यात टॅनिनचे प्रमाण वाढत जाते, ज्यामुळे शरीरातील पोषक तत्वांचे शोषण करण्यास अडथळा येतो.
टॅनिनचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरामध्ये लोहाची कमतरता निर्माण होते. यामुळे रक्तसंबंधित आजार किंवा ॲनिमिया हा होण्याची शक्यता असते.