Mahesh Gaikwad
सकाळी-सकाळी चहाचा घोट घ्यायला कोणाला आवडत नाही. पण सकाळी उपाशीपोटी चहा घेण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतात.
उपाशीपोटी चहा प्यायल्यामुळे पोटातील अॅसिडची मात्रा वाढता. यामुळे गॅस, जळजळ आणि करपट ढेकर येण्याची समस्या होते.
चहामध्ये असणारे घटकांमुळे पचनरसांच्या निर्मितीवर परिणाम होतो. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. परिणामी बध्दकोष्ठतेची समस्या होते.
उपाशीपोटी चहा प्यायल्याने मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचयाची क्रिया मंदावते. परिणामी उपाशीपोटी चहा पिणे वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो.
सकाळी उपाशीपोटी चहा प्यायल्याने भूक मरते. परिमाणी सकाळचा नाश्ता टाळला जातो. यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषण मिळत नाही.
चहामध्ये कॅफिन असते त्यामुळे उपाशीपोटी चहा घेतल्याने शरीरातील झोपेचे चक्र बिघडते.
महिलांमध्ये उपाशीपोटी चहा प्यायल्याने हार्मोन्स असंतुलित होण्याची शक्यता असते. परिणामी मासिक पाळीमध्ये अनियमितता येते.
चहातील कॅफिन आणि अॅसिड शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.