Aslam Abdul Shanedivan
लिंबू पाणी पिण्याची प्रथा शतकानुशतके चालत आली असून लिंबूमुळे व्हिटॅमिन सी मिळते. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याससह आपले वजन कमी करण्यास मदत करते
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, ई, ए, लोह, कॅल्शियम, फायबर असते. जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.
जर अपचनाची तक्रार असेल तर गरम पाण्यात लिंबू पिळून घ्या. लिंबातील जीवनसत्त्वे आणि खनिजे पचनक्रिया व्यवस्थित ठेवून गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात.
गरम पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कोमट पाण्यातून लिंबू मिसळून प्यायल्यास अशक्तपणा दूर होतो. तसेच लिंबूतील अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन बी हे हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करतात.
लिंबाच्या रसात गरम पाणी मिसळून प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासाठी लिंबूतील व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते
कोमट पाण्यातून लिंबू मिसळून प्यायल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. लिंबूचे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.