sandeep Shirguppe
सर्दी, खोकला, घसा खवखवणे या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुळस-आल्याचा कडक चहा उपयुक्त आहे.
तुळस आणि आलं हे दोन्ही ही नैसर्गिक घटक आहेत. या आयुर्वेदिक चहाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.
हिवाळ्यात आजारांना कारणीभूत असणाऱ्या अनेक जिवाणू आणि जंतूंना नष्ट करण्याचे काम हे दोन्ही घटक करतात.
तुळस आणि आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात.
शिवाय, आले आणि तुळस दोन्ही घटकांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात.
तुळस आणि आल्यातील गुणधर्म घशातील जंतूंना नष्ट करण्याचे काम करतात.
व्हायरलं फिव्हरमध्ये तर हा हर्बल चहा आवर्जून पिल्यास शरिराला आराम मिळतो.