sandeep Shirguppe
अंजीरला सूपरफूड म्हणून ओळखले जाते. यामध्ये अनेक गुणधर्म आहेत ज्याचा आरोग्याला फायदा होतो.
सकाळी अंजीरचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतील. यामुळे वजन नियंत्रणात राहाते.
अंजीरमध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ऍसिड असल्याने हृदयविकारासह मधुमेहाला प्रतिबंध करण्यास मदत होते.
अंजीर पाणी पिल्यास हाडांसाठी चांगले टॉनिक मानले जाते, यामुळे सांधे निरोगी राहण्यास मदत होते.
अंजीरमध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते रक्तातील साखर नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन केल्यास फायदा होतो.
पांढऱ्या डागांवर अंजीराच्या पानांचा रस किंवा अंजीरचे दूध लावल्यास फायदा होतो.
२ महिने नियमितपणे बडीशेपबरोबर अंजीर चावून खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढण्यास मदत होते.s