Alcohol On Plane : विमानात मद्यपान केल्यास फायदे नाही होतील भयंकर दुष्परिणाम

sandeep Shirguppe

विमानात मद्यपान

लोकांना विमानाने प्रवास करताना मद्यपान करणे आवडते. जगभरातील अनेक एअरलाईन्स फ्लाइटमध्ये अल्कोहोलिक पेय देतात आणि लोक त्यांचा पुरेपूर आनंद घेतात.

Alcohol On Plane | agrowon

संशोधन

मेडिकल जर्नल थोरॅक्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात समोर आले की विमान प्रवासादरम्यान मद्यपान केल्यास आरोग्यासाठी चांगले नसते.

Alcohol On Plane | agrowon

हवेचा दाब

विमानातील हवेचा दाब कमी होतो आणि अशा स्थितीत मद्यपान करून झोपल्याने लोकांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.

Alcohol On Plane | agrowon

हृदयाचे ठोके वाढणे

त्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. हायपोबॅरिक स्थितीत अल्कोहोल पिऊन झोपल्याने हृदयाच्या प्रणालीवर खूप दबाव पडतो.

Alcohol On Plane | agrowon

फुफ्फुसाच्या समस्या

यामुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केवळ रुग्णच नाही तर निरोगी लोकांनीही असे केल्यास हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Alcohol On Plane | agrowon

अतिमद्यपान

हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की , विमान प्रवासादरम्यान अतिमद्यपान केल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Alcohol On Plane | agrowon

ऑक्सिजन सॅच्युरेशन

संशोधनानुसार रक्तातील ऑक्सिजन सॅच्युरेशन ८५% च्या खाली गेली आणि त्यांच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट सरासरी ८८ बीट्स पर्यंत वाढले.

Alcohol On Plane | agrowon