Roshan Talape
गाजर ज्यूसमध्ये भरपूर व्हिटॅमिन A आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हा ज्यूस त्वचा तेजस्वी करतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
बीट ज्यूस रक्त शुद्ध करतो आणि लिव्हर साफ ठेवतो. त्वचेचा निखार वाढवतो आणि थकवा कमी करतो.
विटॅमिन C चा उत्तम स्रोत म्हणजे आवळा! तो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि केस-त्वचेसाठी लाभदायक आहे.
आले आणि लिंबाचा मिलाफ शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतो. पचन सुधारतो आणि मुरुमे कमी करतो.
पुदिना ज्यूस शरीर थंड ठेवतो, त्वचेला हायड्रेट करतो. तो मूत्रमार्ग साफ करतो आणि शरीराला फ्रेश ठेवतो.
एलोवेरा आतड्यांसाठी फायदेशीर असून, केस व त्वचेसाठी उत्तम आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त आहे.
हे सगळे ज्यूस सकाळी उपाशीपोटी किंवा जेवणाआधी प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरतात.