Roshan Talape
जाड व फिकट रंगाचे पडदे सूर्यकिरण अडवतात, त्यामुळे घरात थेट उष्णता येत नाही. यामुळे घराचे तापमान २–३ अंशांनी थंड राहते.
गालिचा उष्णता साठवतो, त्यामुळे उन्हाळ्यात घर अधिक गरम होते. याउलट उघड्या टाईल्समुळे थंडावा टिकतो आणि थंड वातावरण तयार होते.
घरातील भिंतींचा रंग पांढरा किंवा फिकट असावा. असे रंग सूर्यकिरण परावर्तित करतो, त्यामुळे घरातील उष्णता कमी होते आणि उन्हाळ्यात घर नैसर्गिकरित्या थंड राहते.
फ्रिजऐवजी मातीच्या माठात पाणी थंड आणि ताजं राहतं. यामुळे वीज वाचते आणि पाणी आरोग्यदायी राहतं.
घरातील समोरासमोरच्या खिडक्या उघडल्याने ताजी हवा खेळती राहते, ज्यामुळे वीज न वापरता घर नैसर्गिकरित्या थंड राहते.
दुपारच्या वेळी घराच्या छपरावर पाणी शिंपडल्याने उष्णतेचा प्रवेश कमी होतो. त्याचप्रमाणे थर्मल कोटिंग वापरल्यास घर अधिक काळ थंड राहण्यास मदत मिळते.
हलक्या रंगाचे पडदे आणि मिरर वर्क वापरून घरात थंडावा राखा. हे सजावटीचे उपाय घराला थंड आणि आकर्षक बनवतात.
घराच्या आजूबाजूला झाडं आणि वेली लावा. यामुळे घरावर थेट सूर्यकिरण पडणार नाहीत आणि उष्णता कमी होईल.