Anuradha Vipat
ड्रेसिंग टेबलचा आरसा स्वच्छ करणे सोपे आहे पण त्यासाठी योग्य पद्धत वापरल्यास आरसा पूर्णपणे डागरहित आणि चमकदार दिसतो.
आरशावर असलेली धूळ एका कोरड्या आणि मऊ कापडाने हळूवारपणे पुसून घ्या.
स्प्रे बाटलीत अर्धे पाणी आणि अर्धे पांढरे व्हिनेगर मिसळा. क्लिनर थेट आरशावर स्प्रे करा.
मायक्रोफायबर कापड किंवा वर्तमानपत्राचा गोळा घ्या आणि आरसा पूसून घ्या.
जाड किंवा खडबडीत कापड वापरू नका कारण त्यामुळे आरशावर ओरखडे उमटू शकतात.
आरशाच्या कडा किंवा कोपऱ्यातील घाण साफ करण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करा.
जर तुमचा ड्रेसिंग टेबल लाकडी असेल, तर व्हिनेगर हा सुरक्षित पर्याय आहे.