Anuradha Vipat
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात प्राणी दिसण्याचे वेगवेगळे शुभ आणि अशुभ अर्थ होतात.
स्वप्नात हत्ती दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. हे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळण्याचे प्रतीक आहे.
गाय दिसणे हे सात्त्विकतेचे आणि धनागमनाचे लक्षण आहे.
जर साप तुम्हाला चावला नाही किंवा तो शांत असेल, तर त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच काही गुप्त धन किंवा लाभ मिळू शकतो.
स्वप्नात सिंह दिसणे हे तुमच्या विजयाचे आणि शत्रूंवर मात करण्याचे प्रतीक आहे.
मांजर दिसणे हे सहसा अशुभ मानले जाते. हे फसवणूक किंवा जवळच्या व्यक्तीशी वाद होण्याचे संकेत असू शकतात.
कुत्रा आनंदी स्थितीत दिसल्यास जुन्या मित्राची भेट होऊ शकते.