Hema Malini : 'ड्रीम गर्ल बसंती' रमली गव्हाच्या काढणीत ; हेमा मालिनीचा हटके अंदाज

Mahesh Gaikwad

लोकसभा निवडणूक

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत यायला सुरूवात झाली आहे. मतदारांना खूष करण्यासाठी उमेदवार कोणतही कसर सोडताना दिसत नाही.

Hema Malini | Agrowon

निवडणूक प्रचार

अशाच एका प्रचारादरम्यान भाजपच्या मथुरा लोकसभेच्या उमेदवार हेमा मालिनी यांचा हटके अंदाज पहायला मिळाला आहे.

Hema Malini | Agrowon

ड्रीम गर्ल

एप्रिल महिन्याच्या कडक उन्हात बॉलिवूडच्या 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनीने मतदारांना खूष करण्यासाठी तळपत्या उन्हात गव्हाची काढणी केली आहे.

Hema Malini | Agrowon

गहू कापणी

हेमा मालिनी यांनी आपल्या एक्स या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटवर गव्हाची कापणी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी महिला शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

Hema Malini | Agrowon

हेमा मालिनी

भाजपने हेमा मालिनी यांनी सलग तिसऱ्यांदा मथुरा लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. गेल्या १० वर्षांपासून त्या या मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Hema Malini

लोकसभा उमेदवार

हेमा मालिनी अनेकदा आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना भेटत असतात.

Hema Malini | Agrowon

प्रेमानंद महाराज

काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली होती. त्यावेळी प्रेमानंद महाराज यांनी त्यांना सर्वसामान्यांमध्ये आपला वेळ घालविण्याचा सल्ला दिला होता.

Premanand Maharaj | Agrowon