Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर कृषी विभागाचे दिमाखदार संचलन

sandeep Shirguppe

प्रजासत्ताक दीन

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या ‘प्रति थेंब अधिक पिक’ आणि ‘कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ ही चित्ररथाची संकल्पना होती.

Republic Day 2024 | agrowon

प्रति थेंब अधिक पिक

राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत‘प्रति थेंब अधिक पिक’ यामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाते.

Republic Day 2024 | agrowon

९० टक्के अनुदान

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येते.

Republic Day 2024 | agrowon

दर्जेदार उत्पादन

पिकांच्या मुळाशी मर्यादित पाणी दिल्याने पिकांची जोमाने वाढ होऊन दर्जेदार उत्पादन मिळते.

Republic Day 2024 | agrowon

सिंचनाखाली क्षेत्र

पिकांच्या मुळाच्या भोवती पाणी, माती व हवा यांचा समन्वय साधला जातो. पाण्याच्या कार्यक्षम वापर होऊन जास्तीस जास्त क्षेत्र सिंचनाखाली येते.

Republic Day 2024 | agrowon

डिजिटल तंत्रज्ञान

कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब यामध्ये पिक आरोग्याची अचूक माहिती, उत्पादन तंत्रज्ञान, एकूण पिकांची उत्पादकता बाजारपेठेतील विविध दरांची माहिती मिळते.

Republic Day 2024 | agrowon

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

पीक संरक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजिएन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर, पीक कापणी प्रयोगाद्वारे अचूक उत्पादकता समजते.

Republic Day 2024 | agrowon

विविध पीक विमा योजना

विविध पीक विमा योजना तसेच योजना अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता व सुसूत्रतेसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध योजनांचा थेट शेतकऱ्यांना लाभ समजतो.

Republic Day 2024 | agrowon

पीक पेरा

तसेच पीक पेरा (ई – पिक पाहणी) योजना इत्यादी योजनांचे संकल्पना या चित्ररथाद्वारे मांडण्यात आली होती.

Republic Day 2024 | agrowon