Anuradha Vipat
बेसिनचा पाईप अनेकदा केस, साबणाचा फेस, तेलकट पदार्थ आणि अन्नाचे कण अडकल्यामुळे चोक-अप होतो.
बेसिनचा पाईप साफ करण्याच्या काही सोप्या आणि प्रभावी घरगुती पद्धती खालीलप्रमाणे आहेत त्या पाहूयात.
गरम पाणी थेट बेसिनच्या पाईपमध्ये ओता. गरम पाण्यामुळे पाईपमधील चरबी, तेलकटपणा वितळून वाहून जाईल
बेसिनच्या पाईपमध्ये बेकिंग सोडा आणि पांढरे व्हिनेगर घाला आणि पाईपचे तोंड झाका. २० ते ३० मिनिटांनंतर उकळते गरम पाणी पाईपमध्ये ओता.
बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र पाईपमध्ये घाला. त्यात थोडे गरम पाणी ओता आणि १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या.
बेसिनच्या पाईपच्या तोंडावर प्लंजर घट्ट बसवा आणि बेसिनमध्ये थोडे पाणी भरा.प्लंजरला वेगाने वर-खाली करा.
या घरगुती टिप्स वापरून तुम्ही कोणत्याही रसायनांशिवाय बेसिनचा पाईप सहज साफ करू शकता.