Mahesh Gaikwad
कार्डियाक अरेस्ट म्हणजे ह्रदयाचे ठोके अचानकपणे बंद होणे. यामुळे ह्रदय शरीरात रक्त पंप करणे थांबवते व रक्तप्रवाह बंद होतो.
रक्तदाब नियंत्रित न ठेवल्यास ह्रदयावर ताण येतो. परिणाम रुग्णाला कार्डियाक अरेस्टचा धोका होण्याची शक्यता वाढते.
शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा थांबतो आणि कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो.
दारूचे अतिसेवन आणि सतत धूम्रपानामुळे हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. यामुळे कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो.
डायबिटीस आणि शरीराचे जास्त वजन हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. यामुळे हृदय निकामी होण्याचा धोका दुपटीने वाढतो.
प्रक्रिया केलेले, तळलेले पदार्थ ह्रदय विकार असलेल्या व्यक्तीसाठी खाणे चांगले नाही. यामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
सतत मानसिक तणावात राहणे आणि नीट झोप न लागणे हे दोन्ही हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. परिणामी कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली आणि व्यसनमुक्तता आवश्यक आहे.