Mahesh Gaikwad
अनेकांना लघवी रोखून ठेवण्याची वाईट सवय असते. लघवी रोखण्याची हीच सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्यास मूत्राशयावर दाब निर्माण होतो. वारंवार असे केल्यास मूत्राशयाची स्नायू शक्ती कमी होते.
लघवी शरीरात साचून राहिल्यास त्यातील जीवाणूंना वाढतात, ज्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
दीर्घकाळ लघवी रोखल्यामुळे मूत्राशयात दाह, जळजळ, आणि वेदना जाणवू शकतात. यामुळे दरवेळी लघवी करताना त्रास होतो.
योग्यवेळी लघवी विसर्जित न केल्यास त्यातील खनिज साचून राहतात आणि त्यामुळे युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो.
मूत्रमार्गाचा संसर्ग वेळीच न रोखल्यास हा संसर्ग मूत्रपिंडापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे किडनी डॅमेजचा धोका निर्माण होतो.
लघवी रोखण्याच्या सवयीमुळे मूत्रमार्गावर सतत दाब पडतो आणि त्यामुळे लैंगिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
लघवी अजिबात रोखू नये. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. वेळच्या वेळी शौचालयास जावे. लघवी रोखण्याची सवय असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.