Sainath Jadhav
आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. चहात किंवा जेवणात आलं घालून रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
लसणात अॅलिसिन नावाचे संयुग आहे, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. रोजच्या जेवणात लसणाचा वापर करा.
पालक, मेथी यांसारख्या हिरव्या भाज्या व्हिटॅमिन A, C आणि K ने समृद्ध असतात. यामुळे रोगांशी लढण्याची ताकद मिळते.
संत्र, मोसंबी यामधील व्हिटॅमिन C रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दीपासून संरक्षण करते.
बदाम, अक्रोड आणि काजू यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन E आहे, जे शरीराला बळकटी देतात.Turmeric
हळदीतील कर्क्युमिन बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढते. दूध किंवा जेवणात हळद वापरा.
दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. रोज दही खा!